कोबी आणि फुलकोबी






मराठी स्टेशन वरती आपल्या सर्वांचे स्वागत शेतकरी बांधवांनो आज अनेक शेतकरी विविध मार्गाने चांगली शेती करून पैसे कमवून आपली आर्थिक उन्नती साधत आहेत. पन आजही असे काय शेतकरी आहेत ज्यांना विविध तंत्रज्ञान आणि शेती च्या अश्या बऱ्याच पिकांबद्दल माहिती नाही ज्यात ते शेती करून लाखों रुपये कामवू शकतात आज आपण त्या पैकी कोबी आणि फुलकोबी या पिकांविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला कोबी आणि फूल कोबी या पिकाविषयी कमी खर्चीक आणि अधिक चांगली माहीती मिळेल.




लागवडी पूर्वी :

कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी त्याची त्या शेताची मशागत चांगली असणे खूप महत्वाचे असते.


शेतीची व्यवस्थित नांगरट करून घ्यावी.


नांगरट झाल्याच्यानंतर योग्य पद्धतीने मोगडा पाळी करून घ्यावी.


आता मोगडा पाळी करून घेण्या अगोदर आपल्या शेतात 2 ते 3 ट्रॉली शेणखत टाकून घ्यावे,आणि आता मोगडा पाळी करून झाली म्हणजे ते खत बारीक होऊन सगळ्या जमिनीत मिसळेल.


मोगडा पाळी करून झाली की,आता आपली जमीन लागवडिस योग्य आहे.


आता आपण जर ठिबक वरती लागवड करणार असाल तर 4x 4 च्या पद्धतीने गादी वाफे काढून घ्यावेत.


जर आपण पाट पद्धतीने लागवड करणार असाल तर नीट आणि थोडेसे उंचीवर पडेल अश्या रीतीने पाट काढून घ्यावेत.
👉सोयाबीन पिकाचे असे नियोजन करून चांगले उत्पन्न मिळवा




रोपे आणि बियांनाविषयी:

आपण जर घरीच रोपे बनवत असाल तर कधीही योग्य कारण आज जर आपण रोपवाटीकेमध्ये रोपे बनवायला दिली तर आता कोणताही रोपवाटीकेवाला कितीही नाही म्हणल तरी पण आता 1 रोप 1रुपया किंवा त्यापेक्षा थोडस जास्त पैसे घेतात.


घरी जर आपण रोपे बनवली तर त्याचा फायदा हा एक राहतो की एक तर आपले पैसे वाचतात सोबतच आपण ज्या वेळी रोपवाटीकेतून रोपे आणतो त्यावेळी तिथले वातावरण वेगळे असते.


आणि आपल्या शेतातले वातावरण वेगळे असते. अश्या वेळी आपण ज्यावेळी रोपवाटीकेमधील रोपे आणून शेतीत लावतो त्यावेळी एक तर त्याची मर होते किंवा ते अधिक रोगांना बळी पडतात ज्याचा आपल्या उत्पन्न आणि खर्च दोन्ही बाबींवर परिनाम होतो.


घरी लागवड करताना आपण स्ट्रे आणि कोकोपीट घ्यावे लागेल.


आता आपणाला ज्या चांगल्या बियांनाची लागवड करायची आहे ती बियाणे त्या स्ट्रे मध्ये प्रत्येक होल मध्ये एक बियाणे नीट लावून घ्यावी.


आता हे स्ट्रे नीट एखादे आपले जेथे सेड आहे तेथे हे ठेवावे. शक्यतो अशा जागी ठेवावे जेथे सकाळचे तरी कोवळे ऊन पोहोचते.


आणि जर नसेल तर एखादे झाड असेल तेथे ठेवायचे आणि तेथे चारी बाजूंनी त्याला साड्या किंवा एखाद्या चांगल्या कशाने तरी बांधून घ्यायचे जेणे करून कुत्रे किंवा जनावरे त्यात शिरणार नाहीत.


आता आपण रोपे तयार केली आहेत आता जवळ पास आपले 80% काम तर झालेच आहे.


आता त्याला झाऱ्याने पानी घालने आणि वायरस आणि 19:19:19 ची फवारणी करणे याची काळजी घेणे गरजेचे आहे आता ते कसे आपण पाहू.


ज्या दिवशी रोपे साठी स्ट्रे भरले त्या दिवसापासून त्या स्ट्रे ला पानी घालणे त्याची नीट काळजी घेणे खूप गरजेचे आहे. दिवसातून 3 वेळेस त्याला झाऱ्याने पानी घालणे गरजेचे आहे.


आता 4 ते 5 दिवसापासून आपणाला रोपे चांगली उगवलेले दिसायला चालू होतात.9 व्या दिवशी आपण 19:19:19 ची फवारणी करून घ्यावी.15 व्या दिवशी आपण एखादे चांगले टॉणीक फवारून घ्यावे ज्याने त्याची प्रकाश संसलेशन आणि वाढ क्रिया चांगली होईल.


20 व्या दिवशी आपण एखादे वासरस वरचे औषध घेऊन फवारावे. आता आपली रोपे 25 व्या दिवशी लावण्यास योग्य आहे.


आता आपण ठिबक वरती जर लागवड करत असाल तर,एक रोप आर्धा ते पाऊण फुट वर लावावे शक्यतो पावून फुटावर लावावे. कारण कोबी फे पीक अधिक अंतर पसरायला घेते. आणि आपण जर लागवड जास्त दाट केली तर आपनाला मिळणारे उत्पन्न कमी होईल. कारण त्याचे आपणाला हवे तसे वजन वाढणार नाही.





कोबी लागवड कशी करावी ?

कोबी लागवड करताना काही विशेष काळज्या घेणे गरजेचे आहे ते आपण खाली सविस्तरपणे पाहू-


कोबी लागवड करताना अगोदर शेतात 18:46:00 हे खत क्विंटल भर टाकावे.


कोबी लागवड करताना प्रथम आपण रोपे लावण्या अगोदर ठिबक वरती पानी सोडून द्यायचे कमीत कमी 3 ते 4 तास पानी सोडून दिल्यानंतर आता आपण त्याला 2 दिवस काहीच करायचे नाही जेव्हा आपले रान वाफस्याला येईल त्या वेळी आपण लागवड करावी.


लागवड शक्यतो करताना एक तर सकाळी किंवा संध्याकाळी करावी,थोडक्यात काय तर कोवळे ऊन असेल तर रोपे सुकून मारण्याची शक्यता कमी असते त्यामुळे लागवड नेहमी सकाळ 10 च्या आत 4.30 च्या नंतर करावी.


लागवड केल्यानंतर लगेच त्याला थोडे पानी सोडून द्यायचे.


आता लागवड करून झाली आता आपण पुढील नियोजन पाहू.

लागवड झाल्यानंतर नियोजन कसे असावे?

लागवड झाली की आता त्याला फक्त 5 ते सहा दिवस काही नाही करायचे 6 दिवसानंतर त्याला एकरी या ते 1.5 किलो 14 दिवसापर्यंत (लागवडीपासून) एक दिवस आड करून 19:19:19 ची ड्रिचिंग द्यावी.


15 व्या दिवशी पांढरी मुळीचे औषध द्यावे आणि 15 दिवसाच्या नंतर पासून पुढे आता 1 किलो 19:19:19: आणि 0.250 ग्राम युरिया ची ड्रिचिंग द्यावी.


आता तीस दिवसानंतर वेळ येते ती ही की त्याला वजन वाढीवणे आणि फुगणे याची ड्रिचिंग देण्याची. यासाठी तुम्ही 0:52:34 किंवा 0:0:50 अशी खाते वापरू शकता.


आता राहिला विषय तो म्हणजे फवारणीचा फवारणी करताना आपण नेहमी जागरूक राहिले पाहिजे.फवारणी करताना आपण रोगांची माहिती घेतली पाहिजे या पिकावर कोणते रोग येतात किंवा येण्याची शक्यता असते हे आपणाला कळलं की आपल्या शेतिचे आणि पिकाचे गणित आपल्याला जुळले असे समजावे.


झाले या पलीकडे शेतीमध्ये असे विशेष काहीच नसते फक्त नवीन शेतकरी तरकारी करताना आपला कीती खर्च होईल आणि आपणाला त्याचे काय उत्पन्न होईल की नाही यामुळे चिंतेत असतो आणि त्यात हे बाजारातील दुकानदार नवीन शेतकऱ्यांचा येथेच फायदा घेतात आणि नको असलेले औषधे आणि बाकी खाते शेतकऱ्यांच्या अंगलोट टाकून देतात आणि तो बिचारा नवीन असल्याने आपल्या पीकाला काही होऊ नये म्हणून भीतीने ते सर्व घेतो.


आणि येथेच गणित फसते जर समजा मार्केट पडले तर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी निघते ते होऊ नये म्हणूनच हा लेख लिहितो आहे.


म्हणून सांगतो शेतकरी बंधूंनो शेती ही आपल्याला भरपूर मिळवून देऊ शकते फक्त नियोजन आणि मेहनत योग्य झाले पाहिजे आता आपण खाली कोबी या पिकावर कोण-कोणते रोग पडतात ते पाहू म्हणजे आपणाला सर्व माहिती कळेल.







कोबी या पिकावर पडणारे रोग आणि त्याची माहिती

कोबी पिकावर आळी

हा कोबी वरचा सर्वात मोठा घातक रोग मानला जातो.


आज रोग कोबी वर पडला आणि आपल्या पिकावर अडीने आक्रमण केले तर याचे फारच वाईट दुष्परिणाम होतात आणि आपल्या उत्पन्नावर देखील याचा खूप मोठा परिणाम होतो.याचे नियोजन करण्यासाठी पहिल्यापासूनच आपले पिकावर खूप बारकाईने लक्ष असायला हवे हा रोग आपल्या कोबी पिकावर घातक ठरवू नये म्हणून प्रत्येक तीन ते चार दिवसाला अळीची औषधाची फवारणी घेतली पाहिजे.


यासाठी तुम्ही दोनशे ते वापरा ज्यांचा रिझल्ट हा खूप चांगला असेलआणि यामध्ये तुम्ही आदलून बदलून अळीसाठी दोन वेगळी वेगळी औषधे वापरा.

2.मावा

हे हिरव्या किंवा काळ्या कलरचे किडी असतात आणि या किडी पाने मधील रस शोसून घेतात ज्यामुळे पाने पिवळी पडून काही कालांतरणे ही पाने पिवळी पडून सुकून जाऊन मरतात.


यासाठी आपण 6 ते 7 दिवसाला याची फवारणी घेणे गरजेचे असते.

3. पतंग किडे/चौकोनी ठिपक्याचा पतंग

हीच किडे मुख्याता अळ्यांना जन्म देतात आणि या आल्या पानांच्या खालच्या बाजूला राहून पाणी खातात ज्यामुळे पानाला किंवा संपूर्ण कोबीला खूप गोळे पडून आपले उत्पन्नात घट होते.


याच्या नियोजनासाठी आपण 10 ते a दिवसाला वेगळी वेगळी औषधे बदलून फवारणी केली तर त्याचा खूप फायदा होईल. (उदा. फ्लूबेनडीमाईड किंवा फिफ्रोंनील हे कंटेंट असलेली औषधे)

4. ब्लॅकरॉट/घाण्या रोग

हा रोग या पिकाला मुख्यतः जमिनीतून किंवा खराब बियाणा मधून होतो.


या रोगामुळे खोडाच्या आतील बाजू काळी पडते आणि पाणी पिवळी पडून पानांच्या शिरा काळे होतात.


मुख्यतः रोग बॅक्टेरियामुळे होतो.


हा रोग थांबवण्यासाठी आपण ज्यावेळी बियाणांपासून लागवड करतो त्यावेळी थोड्याशा गरम पाण्यात म्हणजेच 40 ते 50 अंश से. बियाणे बुडवून ठेवावीत व सुकल्यानंतर त्याच्यावर कॅप्टन हे औषध सोडून लावावे आणि याहीपेक्षा सर्वात भारी उपाय म्हणजे एक तर आपण ज्या वेळेस बियाणे घेतो त्यावेळेस अशा बियाणांची निवड करा ज्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असेल असे केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवरती होणार नाही.


कोबी पिकाबद्दल बाकीची माहीती थोडक्यात

आरोग्यासाठी फायदेशीर

कोबीमध्ये अ ब आणि क ही जीवनसत्वे असतात यामुळे याला विशेष आहारात महत्त्व आहे.


कोबीमध्ये खनिज द्रव्य जसे की सल्फर,चुना.सोडियमपोटॅशियम आणि लोह असतात.


2.हवामान

सर्वसाधारणपणे कोबी या पिकास गारवा जास्त मानवतो म्हणजे कोबी आणि फुलकोबी ही पिके हिवाळ्यात जास्त घेतली जाणारी पिके आहेत. जास्त करून स्पटेबर आणि ऑक्टोबर महिन्यात याची जास्त लागवड केली जाते.


पण आज याला डावलून कोबी आणि फुलकोबी हे पीक कधी पण घेता येते पण आपल्याला त्याची विशेष काळजी घ्यावी लागते.


खास करून उन्हाळ्यात कोबी पिकाची आपणाला जास्त काळजी घेणेची गरज आहे कारण उन्हाळ्यात त्याची वजन वाढ वरती विशेष लक्ष देणे गरजेचे असते त्यामुळे आपण कधी जर उन्हाळ्यात कोबी पीक घेतले तर आपणास त्याचे खूप नियोजन करावे लागते आणि सोबतच उन्हाळी कोबीला भाव पण जास्त भेटतो.
👉मिरची शेती अशी करून तुम्ही मिळवू शकता लाखों रुपये



3.काढणी आणि उत्पादन

कोबी हे असे पीक आहे जे अडीच ते तीन महिन्यांमध्ये निघते यामध्ये जातीनुसार सुद्धा फरक पडू शकतो म्हणजेच काय तर एखाद्या वेळेस एखादी कोणीही लवकर निघतात किंवा कधी उशिरा पण सरासरी कालावधी जर धरला तर कोबी हे पीक अडीच ते तीन महिन्यात निघतेच.


कोबीच्या उत्पन्नाबद्दल बोलायचे झाली तर आत्ता कोबी हे आपणाला 200 ते 250 क्विंटल आणि फुलकोबी हे 100 ते 200 क्विंटल उत्पन्न देते.


कोबी काढताना आणखी एक विशेष काळजी घ्यावी लागते ती म्हणजे कोबी काढण्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर कोणी हा त्याच्या पानाने म्हणजेच कोबीचा जो खड्डा आहे तो कोबीच्या पानांनी झाकून घ्यावा याचा फायदा हा होतो की कोबी हा पिवळा न पडता चमकदार बनतो आणि सूर्यापासून होणारे त्याचे नुकसान किंवा त्याचा पिवळसर पणा कमी होतो.




कोबी आणि फुलकोबी च्या काही जाती

के-1,लेटजार्ड डर्म हेड,पुस डर्म हेड,स्पटेबर अरली,मित्रा,वरुण,रवी,गोल्डन बॉल,माधवी-एफ-1,मनीषा -एफ1,के-एस-क्रॉस,ग्रीन ग्लोब,समर क्वीन,इंडम,विश्वास,ग्रेन-डियर,प्लुटोन,भारती,नामधारीचे-एनएस-22 आणि 25,हरी राणी गोल,गणेश गेल,क्रांति,ईतर.......


आळी साठी तुम्ही ही औषधे वापरू shakta

हेलिओ,इमा-मॅकटिन,कोराजेण.ईतर.....


अशी औषधे जी तुम्ही किटकनाशक म्हणून वापरू शकता.

कराटे,रोगर,मार्शल,बेलिओ,मोनोक्रोटोफॉस कंटेंट असलेली. ईतर....