"सोयाबीन पेरणी"- झाली आता असे करा पुढील नियोजन आणि मिळवा भरपूर उत्पन्न |


नमस्कार आपल्या सर्वांचे मराठी स्टेशन वरती स्वागत आपण आजच्या लेखात सोयाबीन पेरणी नंतर कोणत्या उपाय योजना केल्या पाहिजेत आणि कोणत्या खताची त्याला कीती मात्रा दिली पाहिजे म्हणजे याची माहीती घेणार आहोत आणि तुम्ही जर या पद्धतीने आपल्या सोयाबीन च्या शेतीचे व्ययस्थापण केले तर आपणाला नक्कीच शेतीमध्ये जास्त उत्पन्न मिळेल,त्यामुळे आपला लेख हा शेवटपर्यंत नक्की वाचा. 
शेतकरी मित्रहो या वर्षी म्हणजे 2023 मध्ये मान्सून ने खूप उशीर केला आहे आणि त्यामुले पेरणी ला सुद्धा खूप उशीर झाला आता त्यात जर आपल्याककडून जर आपण पेरलेल्या पिकाचे जर नाही व्यवस्थित नियोजन केले तर आपणाला नक्कीच कमी उत्पन्न मिळेल.

सोयाबीन पेरणी कशी करावी ?

सोयाबीन पेरणी करताना नेहमी विचारपूर्वक करावी कारण,पेरणी जर चुकली तर आपल्या उत्पन्न वर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे आपण पेरणी करताना नियोजन पद्धतीने करावी. सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी आपल्या शेतीची व्यवस्थित मशागत केलेली असावी म्हणजे काय तर,नांगरणी,मोगडा-पाली जर आपण उन्हाळ्यात नीट केलेली असावी आणि जर आपण शेतीची अगोदरच मशगात केलेली असेल तर आपणास त्याचा अधिक फायदा होतो जमीन कसदार आणि तर विरहित झाल्याने आपल्या उत्पन्न मध्ये अधिक फायदा होतो. त्यामुळे शेतीची मशागत होणे खुप महत्त्वाचे ठरते. 
आता आपण पेरणी कशी करावी हे पाहुया- पेरणी करण्यासाठी आपणाला जे बियाणे आहेत ते खात्रीने घ्यावेत त्याची उगवण क्षमता तपासून ते किती प्रमानात उगवतात याची त्या बियाणे विक्रेत्याकडून खात्री करूनच बियाणे खरेदी करावी. बियाणे खरेदीची नेहमी पक्की पावती घ्यावी कारण बियाणे बाबत पुढील काही अडचणी आल्या तर आपणाला त्या पावतीचा नक्की फायदा होतो. 
आता बियाणे पेरणी करताना बियाणे ची अगोदर बीज प्रक्रिया करून घ्यावी. म्हणजे काय तर ,आपण जे बियाणे पेरणार आहोत त्याची उगावण क्षमता चांगली असावी आणि सोबतच ती निरोगी व्हावी म्हणून बियाणे पेरताना त्याला थायम्याक्थोझम चोळून ते 10 मिनिटे सुकवून घ्यावे. आणि नंतर त्याला एखादे जैविक लिक्विड लावून घ्यावे आता आपले बियाणे पेरण्यासाठी अगदी योग्य आहेत. 
आता बियांनाचे एकरी प्रमाण कीती असावे असा प्रश्न बऱ्याच शेतकरी बांधवांना असतो त्यामुळे आता ते शेतीच्या मातीच्या प्रकारावर देखील अवलंबून असते जसे की खडकाळ जमिनीत बियाणे कमी उगवत असल्याने तेथे जरा जास्त दाट पेरणी करतात. जसे की हलक्या रानात 25 ते 30 किलो देखील बियाणे पाडतात. 
पण याच्या पेक्षा एक वेगळे सांगायचे झाले तर बियांनाचे प्रमाण हे एकरी फक्त 22 ते 25 किलो दरम्यान असावे. 
👉👉👉आपण हे देखील वाचा -सोलार पंप मिळवा.

सोयाबीन पेरणी करताना कोणती खते वापरवीत ?

जसे मी अगोदरच सांगितले आहे की जर तुम्हाला सोयाबीन पेरणी करायची असेल तर त्या शेताची अगोदारची मशागत खूप फायद्याची ठरते तसेच जर तुम्ही आपल्या शेतात शेणखत वापरत असाल तर त्या पेक्षा उत्तम खत कोणतेही नसेल कारण शेणखत शेताच्या पूर्ण कमी घटकांची पूर्तता करते. 
आता शेणखत कधी टाकायचे असे आपण विचारात असाल तर जय वेळी आपण शेतची मशागत करतो त्या वेळी एकरी जर समजा तुम्ही 2 ट्रॉली शेणखत टाकले तर पुरेसे होते त्या नंतर त्याची पाली आणि मोगडणी केल्याने खत बारीक होते आणि सर्व शेतात पसरते. 
आता विषय येतो तो हा की,रासायनिक खते कीती वापरवीत? तर आपल्या शेताला जर समजा शेणखत असेल तर एकरी फक्त 30 किलो रासायनिक खत पुरेसे होते. त्यासाठी तुम्ही 10:26:26 आणि 18:46:00 खाते बेस्ट म्हणून वापरू शकता. आता ज्याना शेणखत नाही त्यांनी एकरी 50 किलो रासायनिक खाते वापरायला पाहिजे.आता आपण खता-विषयी पूर्ण माहिती पाहिली.

सोयाबीन पेरणी नंतर करायच्या उपाययोजना-

आता आपली पेरणी झाली की आपल्याला सोयाबीन हे 5 दिवसानंतर उगवताना दिसायला चालू होईल-सोयाबीन हे 5 दिवसापासून 8 दिवसापर्यंत चांगले दिसू लागते. आता 8 दिवसाच्या पुढून 15 दिवसानंतर आपण म्हनजेच पेरणी पासून 23 दिवसानंतर एकरी 25 किलो युरिया आपण शेतात टाकावा जर शक्य झाले तर चालू पावसात टाकला तर कधीही योग्य (पावूस कमी असताना) किंवा पावूस बंद झाल्या झाल्या टाकावा. 
आता वेळ येते खुरपणीची आता साधारणता 28 ते तीस दिवसानंतर आपण सोयाबीन पेरणी पासून सोयाबीन ची खुरपणी आणि कोळपणी करून सोयाबीन ला नीट माती लावून घ्यावी.
खुरपणी झाली की 40-45 दिवसात आपणास सोयाबीन ला आपल्याला फुलोरा आल्यासारखे दिसेल त्या वेळी आपण सोयाबीन साठी एखादे नीट चौकशी करून फुलासाठी टॉनिक घ्यावे आणि आता त्याची फवारणी करून घ्यावी आता एक बाब कायम लक्षात ठेवा की कधीही फवारणी करताना नेहमी निर्मळ पानी वापरावे शक्यतो विहरीचे वापराल  तर कधी ही योग्यच आता जर आपणाला बोरचे पानी वापरायचे असेल तर त्यासाठी एक p.h  समतोल राखण्यासाठी एक औषध भेटते ते घ्यावे आणि ते कसे वापरावे याबद्दल त्या औषध विक्रेत्या ला विचारावे,तरच आपल्याला रिझल्ट मिळेल.
आता सोयाबीन च्या शेंगा थोड्या मोठ्या झाल्या की,त्यावर आली पडते आता या वेळी तुम्हाला त्याचे नियोजन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला एखादे औषध विक्रेत्याकडून चांगले औषध घ्यायचे आणि त्यावर फवारणी करायची आता आळी चा प्रभाव कमी होईल आणि आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊन आपल्या उत्पन्नात अधिक भर पडेल. 
(येथे मी मुद्दाम कुठल्याही औषध किंवा खत कंपनी चे नाव घ्यायचे टाळले आहे,कारण मला कोणत्याही कंपनीची जाहिरात नाही करायची आहे,त्यामुळे आपण एखादा आपला विश्वासू औषध विक्रेत्या कडून खात्रीने खाते,बियाणे,आणि औषधे खरेदी करावीत)
आपण दिलेली माहिती जर आपणाला आवडली असेल तर आपल्या मित्र,नातेवाईक,शेतकरी बंधु यांना नक्कीच पोहचवा आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना मदत करा,धन्यवाद.