Maharashtra PIk Karj Mafi |महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा पीक कर्जमाफी



Maharashtra PIk Karj Mafi: महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे की 2019 ते 22 मधील शेतकऱ्यांसाठी ज्यांनी ज्यांनी आपले शेती खर्चासाठी पीक कर्ज घेतले आहे त्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा शासनाने आता नुकताच निर्णय घेतला आहे.
संबंधित शासनाच्या निर्णयाचा असा आदेशानुसार जीआर देखील आलेला आहे काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्र मध्ये सत्तेत असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना जाहीर केली होती त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ देखील घेतला होता पण बरेच असे शेतकरी आहेत जे या पीक कर्जमाफीच्या योजने पासून वंचित राहिलेले आहेत तर त्या व्यक्तींसाठी योजना केलेली आहे.

Maharashtra PIk Karj Mafi

महाराष्ट्र शासनाद्वारे ही केली जाणारी पिक कर्ज माफी ही काही ठराविक कालावधीसाठी आहे म्हणजेच काही ठराविक वर्षासाठीच ही पीक कर्जमाफी केली गेलेली आहे या वर्षाच्या पाठीमागे किंवा त्या वर्षाच्या पुढील शेतकरी या पीक कर्जमाफीसाठी पात्र नाहीत तर कोण कोणते योजनेसाठी पात्र आहेत ते पाहू

कोण पात्र आहेत महाराष्ट्र पीक कर्ज माफी साठी?

शासनाच्या नवीन जीआर नुसार पिक कर्ज माफी साठी जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 साठी जे जे शेतकरी पात्र आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी पीक कर्ज घेतले आहे पण देवेंद्र फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत असताना ज्यांनी ज्यांनी पीक कर्जमाफीचा लाभ घेतला नाही फक्त तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

या योजनेसाठी पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना असा देखील मिळणार लाभ

जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की नुकत्याच दिलेल्या शासनाच्या जीआर मधील तरतुदीनुसार जे शेतकरी 2019 च्या पुढील पीक कर्ज घेणार आहेत त्यांना सुद्धा आता पहिले जरी पीक कर्ज असेल तरीसुद्धा ते बँकेमधून नवीन पीक कर्ज घेऊ शकतात तशी तरतूद शासनाने आपल्या जीआर मध्ये केलेली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र मध्ये कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे याचा कालावधी 2019 पासून पुढे ते आतापर्यंत असा असणार आहे त्यामुळे 2019 पर्यंत च्या ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ झाले आहे ते पीक कर्जमाफीचा लाभ घेतील आणि ज्यांचे पीक कर्ज हे 2019 च्या पुढील वर्षापासून आजपर्यंतच्या आहे ते कर्जाच्या पुनर्गठनाद्वारे पीक कर्जाचा लाभ घेतील.

कर्ज पुनर्गठन म्हणजे काय?

बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना आपली पीक कर्ज फेडण्यास किंवा कुठलेही कर्ज मिळण्यास अडचणी होऊ शकतात त्याची बरीच असे कारणे असू शकतात जसे की दुष्काळ किंवा पिकाच्या उत्पन्नातून मिळणारा कमी लाभ किंवा त्यावर्षीचा असणारा पिकांसाठीचा भाऊ त्यामुळे अशावेळी शेतकरी आपले पीक कर्ज फेडण्यास किंवा कुठलीही कर्ज फेडण्यास समर्थ ठरतात अशावेळी शेतकरी आणखीन कर्जामध्ये बोलू नये म्हणून शासनाद्वारे पिकाचे किंवा कर्जाचे पुनर्गठन केले जाते.
कर्जाचे पुनर्गठन म्हणजे पाठीमागचे कर्ज थकीत असताना देखील शेतकऱ्यांना नवीन आपल्या उत्पन्नासाठी किंवा शेतीसाठी पीक कर्ज घेण्यात येते हे दिले जाणारे पीक कर्ज माफीचे पीक कर्ज नसून बँकांना शेतकऱ्यांकडून ते पीक कर्ज घेण्यास एक कोट पद्धतीने न घेता टप्प्याटप्प्याने फेडण्यास अनुमती दिली जाते.
थोडक्यात काय तर कर्जाच्या पुनर्गठन प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना एक सोबत पीक कर्ज नफेडता टप्प्याटप्प्याने फिरता येते त्यामुळे शेतकरी जुने कर्ज असून देखील नवीन पीक कर्ज घेण्यास पात्र ठरतात व हे दिले जाणारे पीक कर्ज ते टप्प्याटप्प्याने फेडू शकतात.