"शिवकर बापुजी तळपदे":राईट बंधु च्या ही अगोदर लावला होता विमानाचा शोध.

 विमानाचा शोध या मराठी माणसाने लावला.

नमस्कार मराठी वाचकहो आपणा सर्वांचे आपल्या लाडक्या मराठी स्टेशन वरती स्वागत आहे. मराठी स्टेशन वर आपन नेहमी विविध बातम्या,शेती योजना,सरकारी योजना,नोकरी आणि विविध ज्ञानपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे अशी माहिती आपणा पर्यंत कायम पोहोचत राहण्यासाठी आपल्या या पेज ला नक्की जॉइन व्हा. 

"लेखा-बद्दल" 

जसे आपणास माहिती आहे की आज विज्ञान अनेक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि यामध्ये विविध ज्ञानी व्यक्तींनी आपले योगदान दिले आहेआणि याचंच एक खास उदाहरण म्हणजे विमान क्षेत्रातील प्रगती. 
  विमानाचा शोध कोणी लावला म्हंटल की आपण सहजपणे म्हणून जातो की राईट बंधु यांनी लावला पण आपणा सर्वांना जाणून आश्चर्य होईल की राईट बंधु यांच्या अगोदर सुद्धा विमानाचा शोध हा एक मराठी व्यक्तिनि लावला आहे पण त्या व्यक्तीचे नाव इतिहासाच्या पानामद्धे लपले गेले आहे. त्याच व्यक्तीबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.  

कोण आहे ती मराठी व्यक्ति ज्याने विमानाचा शोध लावला -

विमान बनविणारी पहिली व्यक्ति शिवकर बापुजी तळपदे-(शिवकर बापुजी तळपदे/shivkar bapuji talpade )

                     तर त्या व्यक्तीचे नाव आहे शिवकर बापुजी तळपदे होय तुम्ही अगदी खरे ऐकले आहे राइट बंधु यांच्या अगोदर एक मराठी व्यक्तीने विमानाचा शोध लावला होता.शिवकर बापुजी तळपदे  हे मूळचे मुंबई चे त्यांचे शिक्षण हे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स येथे झाले.आणि नंतर त्यांनी तेथेच अध्यापणाचे काम केले.

यांच्या कडून मिळाली होती त्यांना विमान बनविण्याची प्रेरणा-

            ते संस्कृत विषयाचे  गाढे अध्यापक होते. आणि त्यांना विमान बनविन्याची प्रेरणा ही पंडित सूब्राय यांच्याकडून मिळाली. त्यांच्या वैमानिक शास्त्र या अभ्यास ग्रंथावरून त्यांना विमान उडविन्याची प्रेरणा मिळाली. 
                           त्यांनी आपल्या घरच्याच प्रयोगशाळेत विमान बनविले. आता वेळ येते विमान प्रत्यक्षात उडविण्याची त्यांनी आपल्या विमानाचे नाव मरुतसखा ठेवले.

प्रत्यक्षात  विमान उडवून यशस्वी प्रयोग केला,अनेक जन याचे होते साक्षीदार 

1895 साली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर तळपडे यांनी पोळीसच्या परवानगिने मानवरहित विमान विमान उडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि या क्षणाचे अनेक जन साक्षी होते त्यात खास करून महादेव गोविंद रानडे आणि तिसरे सायजि राव गायकवाड हे देखील उपस्थित होते.  या बद्दल टिळकांच्या केसरी  मध्ये सुद्धा लेख आला होता.

आर्थिक मदत नाही मिळाल्याने त्यांचे विमान आणि प्रयोग इतिहासाच्या  पानाआड -

 या प्रयोगानंतर हे विमान तळपदे यांच्या घरी ठेवण्यात आले. पण आता पूढील प्रयोगासाठी तळपदे यांना 50000 रुपयांची गरज होती पण काही कारणास्तव ते पैसे जमले नाहीत आणि तळपदे यांचे नाव आणि त्यांचा वैमानिक प्रयोग इतिहास आणि काळाच्या आड हरवून गेला.