मिरची शेती : कमी खर्च आणि लाखांमध्ये उत्पन्न देणारे पीक

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या स्टेशन म्हणजे मराठी स्टेशन वरती स्वागत. आपण आपल्या स्टेशन वरती नेहमी योग्य आणि अचूक माहीती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण मिरची पीक विषयी माहिती घेणार आहोत जेणेकरून अनेक शेतकरी या माहितीचा फायदा घेऊन अधिक उत्पन्न घेऊन समृद्ध बनतील तर आपला हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

होय, शेतकरी बांधवानो मिरची हे एक असे पीक आहे ज्यात आपण  कमी खर्च करून अधिक उत्पन्न मिळवू शकतो आणि तेही खात्रीने ज्यात आपण एकरी नाही नाही म्हंटले तरी लाख रुपये सहज कमवू शकतो. 

"मिरची शेती"का करावी ?

  1. मिरची शेती करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की,त्याला कमी खर्च येतो आणि या कमी खर्चात आपण बाकी पिके आणि त्याच्या उत्पन्न पेक्षा अधिक पटीने उत्पन्न मिळवू शकतो. 
  2. तसेच मिरची हे एकमेव असे शेतकरी वर्ग साठी फायद्याचे पीक आहे ज्यात आपण हिरव्या मिरचीला जरी आपणाला योग्य भाव नाही मिळाला तर आपण ती मिरची वाळवून त्या मधून अधिक पैसे मिळवू शकतो. 
  3. जसे की आपणाला माहिती आहे की वाळल्या मिरचीला 12 ही महीने मागणी असून ती कमीत कमी 250 रुपये किलो ने तरी सहज जाते,आणि वाळली मिरची एकरी सहज 13 ते 14 क्विंटल आपण सहज मिळवू शकतो. 
  4. जर आपण ठिबक वरती पाण्याचे नियोजन केले तर मिरची हे पीक अगदी मुबलक पाण्यावरती देखील येते. 
  5. मिरची हे तिन्ही म्हणजे उन्हाळा,पावसाळा,आणि हिवाळा तिन्ही हंगामात हमकास येणारे पीक आहे. 

शेतीची पूर्व मशागत कशी करावी?

येथे ही बाब कायम लक्षात घेण्या जोगी आहे की,आपण फक्त मिरची हेच पीक नाही तर कोणतेही पीक घ्यायचे असेल तर आपण आपल्या शेतीची मशागत नीट करणे खूप गरजेचे आहे तरच आपण अधिक उत्पन्न मिळवू शकतो. जसे की आपल्या शेतीतून आपण अगोदरचे पीक काढून घेतले की आपण त्या शेतीची नांगरट करणे खूप गरजेचे असते कारण याने जमिनीचा वरचा जो थर असतो अगोदरच्या पिकणे यातील सर्व आवश्यक घटक शोशले असतात आणि आपण जर फक्त साधी पाळी करून जर त्यावर पीक घेतले तर त्याचा नवीन पिकावर आणि त्याच्या वाढीवर परिणाम होतो आणि आपल्याला कमी उत्पन्न मिळते. नांगरट केल्याने खालची माती वर आल्याने जमीन तर भुसभुशीत होतेच सोबतच त्या मातीत आपल्या पिकाला लागणारे घटक मिळतात. 

नांगरट झाली की आपण मोगडा पाळी करून घ्यावी जेणे करून माती बारीक होईल. जर आपल्याकडे शेणखत आधिक असेल तर आपन मोगडा पाळी करण्या-अगोदर कमीत कमी 3 ट्रॉली शेणखत टाकावे आणि मगच मोगडा पाळी करून घ्यावी असे केल्याने माती बारीक होऊन शेणखत त्या मातीमध्ये नीट मिक्स होईल.आता आपली शेती मिरची लावण्यासाठी योग्य आहे आता पुढील प्रक्रिया आपण पाहू. 

"मिरची पिकासाठी" करायचे नियोजन?

आता आपली शेती ही मिरची लागवड करण्यायोग्य झाली आहे आता आपण सर्वप्रथम गादी वाफे काढून घ्यावेत आणि आता गादी वाफे काढतानाच त्या मध्ये रासायनिक खत टाकण्यासाठी फन टाकून घ्यावा म्हणजे आपणाला त्यामध्ये खत टाकायला येईल आणि गादी वाफे काढताना नेहमी 6 बाय 6 च्या अंतराने काढून घ्यावेत म्हणजे काय तर आपणाला फवारणी आणि बाकी नियोजन करताना काही अडचण येणार नाही आणि शेताच्या पिकामध्ये हवा पन खेळती राहते. 

मिरची लावण्याची पद्धत/ मिरची कशी लावावी?

मिरची लावताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे जसे की, ती कीती अंतरावर लावावी? दोन रोपांमधील अंतर कीती असायला हवे? मिरची कशी लावावी. 
  •  मिरची लावताना कधीही आपण त्याला मलचिंग पेपर लावून च करावी कारण,आपणं जर मलचिंग लावून लागवड केली तर आपणाला याचे दोन फायदे होतात ते म्हणजे एक तर तुम्ही याला आपल्या पिकाला रोगापासून वंचित ठेवता(ते असे की,मलचिंग पेपर ची जी पांढरी बाजू असते जी आपण वरच्या बाजूला ठेवतो त्यामुळे कीटकांना त्या पासून प्रकाश परावृत्त होऊन त्यांना येथे काही पीक आहे असे दिसत नाही त्यामुळे कीटक आपल्या पिकपासून लांब राहतात आणि आपल्या पिकावर कीटक पासून पडणारे रोग कमी होतात. 
  •  मलचिंग पेपर चा दूसरा फायदा हा आहे की आपनाला जरी सुरुवातीला याचा खर्च अधिक वाटत असला तरी यापासून आपणाला फायदे अधिक आहेत, आपणाला यामुळे खुरपणी करण्याची गरज नाही आणि खुरपणीच्या खर्चपेक्षा मलचिंग पेपर कधीही स्वस्त पडतो. 
  • आता लागवड करताना जर तुम्ही आपल्या शेतात अगोदर शेणखत टाकले असेल तर आपण आपण फक्त गादी वाफ्यात फक्त 100 किलो 18:46:00 आणि 100 किलो निंबोळी पेंड टाकून घ्यावी आणि हाताने ती माती झाकून घ्यावी. 
  • जर आपण शेणखत अगोदर टाकले नसेल तर आपणाला त्यामध्ये  एकरी 1.5 ट्रॉली शेणखत गादी वाफ्यावर भरून घ्यावे. 
  • खत भरून झाले की,ठिबक अंथरूण घ्यावे आणि आता त्यात पानी सोडावे. 
  • लक्षात घ्या आपण ठिबक अंथरूण घेतले की लगेच आपणाला तेथे मलचिंग टाकून नाही घ्यायचे तर आपणाला मोकळ्या जागेवरच ठिबकणे 4 ते 5 तास पानी सोडून द्यायचे आणि मग नंतर 2 दिवस तसेच राहून द्यायचे. 
  • कारण असे केल्याने जमिनीत रोप किंवा बी योग्य रितीने वाढण्यासाठी फायदा होतो. 
  • पानी दिल्याच्या 2 दिवसांनंतर आता आपण मलचिंग टाकून घ्यायचे आणि त्याला नीट ठिबक च्या गुंडी पाशी बोळे पाडून घ्यायची. 
  • लक्षात घ्या आपण जर साधी मिरची लावत असाल तर आपण फक्त 1.25 फुटच्या ठिबक वर झिग-झ्याग पद्धतीने फक्त एकच बोळ पाडायचे आहे. 
  • आणि आपण जर ढोबळी मिरची लावत असाल तर 1.25 फुटच्या ठीबकवर 2 बोळे पाडायची आणि लागवड करायची. 
  • बोळे पडून झाली की आता त्यात मिरची लावायची लागवड शक्यतो सकाळी सकाळी 10 च्या आता किंवा 5 च्या नंतर करावी त्याचे कारण असे की आपण जय वेळी लागवड करतो त्यावेळी रोपे ही कवळी असल्याने  मलचिंग गरम झाले की,ते त्या रोपाला लागले की रोप मरते. 
  • आणि असे होऊ नये म्हणून आपण मिरची लावली की लगेच पाठीमागे त्या मलचिंग च्या बोळे ना मातीने भरून घ्यायचे म्हणजे असे केल्याने मलचिंग रोपना चिकटले तरी माती असल्याने आता त्याला काही इजा हो नाही. 
  • येथे आणखी एक बाब लक्षात घ्या ती म्हणजे आपण लागवड केल्या केल्या लगेच आपणाला त्याला पानी द्यायचे आहे म्हणजे गरम माती असेल तर त्याचा काही रोपला काही इजा नाही होणार. 
  • मिरची पिकासाठी काही खास जाती- प्राईड,अग्निज्वाला.AK-47,SUNIDHI,हायवेज-078,महिको तेजा -4,ईतर.
  • आता पर्यंतच्या लेखात एवढीच माहिती पुरेशी करू आणि आपण लवकरच मिरची पिकाच्या रोग,उपाययोजना आणि फवारणी वेळपत्रकविषयी माहीती घेणार आहोत त्यामुळे आपल्या या चॅनेल ला फॉलो नक्की करा त्यासाठी तुम्हाला अगदी शेवटी जाव लागेल आणि तेथे फॉलो बटन वर क्लिक करावे लागेल जेणेकरून आपणाला मिळणारी माहिती ही आपल्या पासून वंचित राहणार नाही.
👉आता  शेतकऱ्यांना 6000 ऐवजी मिळणार 12000 रुपये जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा-येथे क्लिक करा

आता आपले पीक हे पुढील वाढीसाठी तयार आहे आपण कायम एक बाब लक्षात घ्या की आपण दिलेली माहिती,ही अगदी कमी खर्चीक आणि अगदी परिपूर्ण असते त्यामुळे आपण जर या पद्धतीने नियोजन केले तर आपणाला नक्कीच कमी खर्चात अधिक नफा मिळेल यात मात्र शंका नाही,जर आपणाला दिलेली माहीती आवडली असेल तर आपल्या या महितीला आपल्या मित्र-नातेवाईक आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या शेतकरी बांधवांना समृद्ध शेतकरी होण्यासाठी मदत करा.