"कांदा लागवड": माहिती मराठी-असे नियोजन करून मिळवू शकतो लाखोंचे उत्पन्न|









नमस्कार सर्व शेतकरी बांधवांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या म्हणजेच मराठी स्टेशन वरती स्वागत आपण आपल्या वेबसाईट वरती कायम शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना शेतीची माहिती बातम्या शिक्षण आरोग्य नोकरी इत्यादी बाबत कायम माहिती देत असतो आपण दिलेली माहितीही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक हितकारक बनवण्याचा प्रयत्न आम्ही करतो शेतीविषयी दिलेली आपण माहिती ही कायम कमी खर्चाची आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक हितकारक ठरेल अशीच बनवण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च अधिक कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक अधिक नफा मिळवता येईल.

कांदा शेती का करावी?

जसं की आपणास माहित आहे की मानवाची तीन मूलभूत गरजा आहेत त्यापैकी अन्न वस्त्र निवारा आहेत त्यापैकी अन्नामध्ये कायमस्वरूपी वापरला जाणारा कांदा हा एक अविभाज्य घटक आहे.


हॉटेल खानावळ किंवा आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा रोजच्या भाज्या किंवा म्हणजे रोज बदल करतो त्याच्यामध्ये कांदा हा लागतोच.


अगदी त्या उक्तीप्रमाणे थोडक्यात काय तर कांदा रोज लागणारी वस्तू असल्याने त्याला कायम म्हणजेच बाराही महिने मागणी असते.


कांद्याला बाराही महिने भाव असल्याने आपण याची व्यवस्थित नियोजन करून अधिक पैसे कमवू शकतो.


कांदा हे पिकातील वर्षभर केव्हाही घेता येते आपणास तर माहीतच आहे की आपण म्हणतो पावसाळी कांदा आणि उन्हाळा कांदा.


कांद्याची शेती का करावी याबाबत आणखी बोलायचे झाले तर कांद्याच्या पिकाचे आपण जर व्यवस्थित नियोजन केले तर कमी खर्चात आपण अधिक उत्पन्न घेऊ शकतो


चला तर मग या लेखामध्ये आपण कांद्याची शेती कशी करावी ते पूर्णपणे पाहू त्यामुळे हा लेख शेवटचा कारण आपण दिलेली माहितीही कमी खर्चात आणि अधिक उत्पन्न मिळवून देणारी आहे.
👉👉कुसुम सोलार पंप योजना पूर्ण माहिती.
कांदा लागवड/ बियाणे टाकण्या पूर्वीची शेतीची मशागत :

लक्षात घ्या मला कुठलीही जरी उत्पन्न घ्यायची असली तरी त्या शेतीची पूर्व पशुपती आपण व्यवस्थित पद्धतीने केलीच पाहिजे तरच आपणाला अधिक फायदा होऊन चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते.


थोडक्यात काय तर आपण ज्यावेळी पूर्व मशागत करतो त्यावेळी आपण आपल्या शेती मधील तन असते ते तर मारूनच टाकत असतो सोबतच आपण नांगरट करताना जमिनीचा जो वरचा थर असतो तो खाली जातो आणि खालचा जो आपल्या विकास उपयुक्त असणारा तर आहे तो वरती येतो त्याचा फायदा असा होतो की वरच्या थरामध्ये आपण पहिली पिकले असल्याने विकास लागणारे आवश्यक घटक हे वरच्या मातीच्या थरात कमी झालेले असतात त्यामुळे नांगरट करणे हे आपल्याला अधिक फायदेशीर ठरते.


आता आपली नांगरेट करून झाली की शेतामध्ये आपण उघडा पाळी किंवा आपण त्याला कुळव मारणे म्हणतो ते करून घ्यायचे आहे.


व मारून झाला की आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे शेणखत जसे की आपणास माहित आहे खतामध्ये सर्वात उत्तम खत जर कोणते असेल तर शेणखत याला पर्याय नाही त्यामुळे कांदा लागवड करण्यापूर्वी आपणाला एकरी तीन ट्रॉली शेणखत सर्व रानामध्ये पसरून घ्यायचे आहे.


आता आपल्या शेतामध्ये शेणखत पसरून झाली की सर्व रानामध्ये आणखी एक वेळेस पाळी किंवा पळवून घ्यायचा त्याचा फायदा हा होतो की सर्व शेणखत हे सर्व रानात पसरून त्याचा सर्वच पिकांना फायदा होतो.


आता वरील गोष्टी करून झाल्या की आपणाला रोप लावण्यासाठी आपले शेत पूर्णपणे तयार आहे.


आपण जर कांदा पेरणी करून पेरणी करत असाल तर आता आपण येथे ट्रॅक्टरने डायरेक्ट कांदा पेरून घेऊ शकतो.


पण जर आपणास कांदा सरीवर किंवा ठिबक वरती लावायचा असेल तर आपणाला सर्वप्रथम रोप तयार करावे लागेल आता कांद्याचे रोप कसे तयार करायचे ते आपण खालील पद्धतीने पाहू.
कांदा लागवड करताना रोप कसे तयार करावे?

करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे की कांद्याचे रोप कसे तयार करायचे कांद्याचे रोप करताना किती बियाणे लागतात किंवा एक एकर कांदा लागवडीसाठी कीती बियाणे टाकावे.


जर आपणाला कांदा लागवड करताना बियाणे टाकून रोपे तयार करायची असेल तर,आपणाला एकरी रोपांसाठी बियाणे लागणार आहेत ती म्हणजे 3.5 किलो बियाणे टाकावेत.


बियाणे टाकताना जेथे आपण बियाने टाकणार आहोत ती जागा तन विरहित आणि भुसभुशीत आणि आणि पाण्याचा निचरा होणारी असावी.


बियाणे टाकण्यापूर्वी आपणाला एव्हरगोल नावाचे बुरशीनाशक भेटते ते घ्यायचे आणि 50 मिली पाण्यासाठी दोन मिली हे बुरशीनाशक त्यात टाकायचे आणि या मिश्रणाने एक किलो बियाणे चोळायचे असे आपण एकरी लागवड करत असाल तर याच प्रमाणे साडेतीन किलो बियाणे साठी असे मिश्रण तयार करून ते बियाणा चोळून घ्यायचे.


हे बुरशीनाशक चोळण्याचा आपल्याला हा फायदा होतो की यामुळे रोपांची मर कमी होते व रोपेही रोग विरहित राहतात.


बुरशीनाशक चोळून घेतल्यानंतर ते बीयाणे वीस ते पंचवीस मिनिटं सुकून द्यायचे आणि आता आपली बियाणे शेतामध्ये टाकण्यास योग्य आहेत.


आपल्याला जिथे बियाणे टाकायचे आहेत ती जागा भुसभुशीत धन विरहित आणि पाण्याची निचरा होणारी असावी.


बियाणे टाकण्यापूर्वी त्या जमिनीवर तीन ते चार किलो युरिया आणि एक ते दीड किलो सुपर फॉस्फेट याचे मिश्रण तयार करून त्या जमिनीवर टाकून घ्यावी.


आता इथे बियाणे टाकताना सारे काढून व्यवस्थितपणे बियाणे टाकून घ्यावीत.


बियाणे टाकून झाल्याच्या नंतर आता आपण जसे पाणी देतो तसे न देता थोड्याशा कमी दबावांमध्ये किंवा कमी प्रेशर मध्ये त्या साऱ्यामध्ये पाणी सोडून द्यायचे याचा फायदा हा होतो की जर आपण जास्त पाण्यामध्ये सारा भिजवाल तर त्या पाण्याच्या वेगामुळे बियाणे वाहून जाऊन एका जागी जाण्याची शक्यता असते.


त्यामुळे बियाणांच्या साऱ्यात पाणी सोडताना कमी वेगाने पाणी सोडावे

.


👉कोबू आणि फुलकोबी शेती पूर्ण माहिती.
रोपाची काळजी कशी घ्यायची?/खत व्यवस्थापन

आता कांद्याचे बियाणे उगवून आल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी त्याला म्हणजेच रोपांना प्रति 20 लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम 19:19:19 टाकून फवारणी करावी.


सोबतच त्या साऱ्यांमध्ये तीन किलो युरिया विस्कटून आणि पाणी द्यावे.


आता रोपांमध्ये काही शेतकरी तन नाशक मारतात.तन नाशक मारताना कधी पण आपण 21 दिवसानंतर मारावे.


जर आपल्या कांद्याचे रोपाची जागा ही जर पाण्याची निचरा न होणारी असेल किंवा तिथे कायम ओलसरपणा राहत असेल आणि त्यामुळे जर आपल्या कांद्याच्या रोपाला करपा आला असेल तर वरती आपण सांगितलेले एवर गोल नावाचे औषध हे सात मिली घेऊन 20 लिटर पाण्यात त्याचे मिश्रण तयार करावे व त्याची फवारणी करून घ्यावी किंवा पाठाच्या पाण्यामध्ये रोपावर पाणी सोडताना त्या पाठांमध्ये आपला फवारा स्प्रे चालू करून सोडून द्यावा यांनी सर्व रोपांना त्या पाण्याबरोबर व्यवस्थितपणे बुरशीनाशक पोहोचून होणारी मर नक्कीच कमी होण्यास मदत होते.


रोपांच्या अवस्थेत असताना कांद्याच्या बियांना आणखी येणारे एक प्रॉब्लेम म्हणजे ती रोपे पिवळे पडून किंवा चुकल्यासारखे होऊन जमिनीवर पडतात यावेळी आपण मार्शल नावाचे जे कीटकनाशक आहे ते घेऊन त्याच्या जोडीला बायोझिन हे घ्यायचे बायोझाईन मुळे पांढऱ्या मुळीच व्यवस्थित वाढ होते आणि रोप हे अधिक निरोगी बनण्यास मदत होते.


फवारणी करताना मार्शलचे प्रमाण हे प्रतिलिटर दीड मिलीने घ्यायचे व बायोझाईनचे प्रमाण प्रतिलिटर दोन मिलीने घ्यायचे.
लागवड आणि खत व्यवस्थापन:

कांदा लागवडीसाठी जी आपण पूर्व मशागत करून रान तयार केले आहे त्या शेतावर आपल्याला एकरी दोन बॅग म्हणजेच एक क्विंटल18:46:000 आणि 30 किलो युरिया 50 किलो सुपर फॉस्पेट आणि दहा किलो बेंसल यांचे एकत्रित मिश्रण करून ते संपूर्ण एक एकर शेतामध्ये पसरून घ्यायचे आणि आता कांदा लागवडीसाठी सरी काढून घ्यायची.


री किंवा सार्‍यावर कांदा लागवड करताना त्या रानांमध्ये किंवा शेतामध्ये ओल असणे गरजेचे आहे किंवा जुन्या पद्धतीप्रमाणे पाणी चालू असताना लावलेला कांदा हा कधी पण फायद्याचा ठरतो.


कांदा लागवडीच्या दहा दिवसानंतर 19:19:19 च्या दोन फवारण्या आठ-आठ दिवसाच्या फरकाने करून घ्याव्यात.


आता कांदा लागवडीचे 21 दिवसानंतर कांद्याची पात व्यवस्थित फुटावी व त्याच्यामध्ये टवटवीतपणा येण्यासाठी 12:61:00 दोन फवारण्या आठ-आठ दिवसांच्या फरकाने करून घ्याव्यात.


कांदा लागवडीच्या 35 दिवसानंतर 13:40:13 च्या दोन फवारणी आठ आठ दिवसाच्या फरकाने करून घ्याव्यात.


कांदा लागवडीच्या 45 दिवसानंतर एकरी खतांचा दुसरा डोस म्हणून चार बॅग म्हणजेच दोन क्विंटल10:26:26 आणि 50 किलो दानेदार पोटॅश टाकून घ्यावे.


कांदा लागवडीच्या सात दिवसानंतर00:52:34 हे विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति पंपाला टाकून याच्या आठ दिवसाच्या फरकाने दोन फवारण्या करून घ्याव्यात.


कांदा लागवडीच्या 70 व्या दिवसापासून पोटॅशियम सोनाईट हे विद्राव्य खत एकरी दीड क्विंटल टाकून घेऊन आपल्या शेतात पाणी द्यावे.


लागवडीच्या 80 दिवसानंतर00:00:50 हे विद्राव्य खत प्रतिपंप 100 ग्रॅम घेऊन त्याची फवारणी करावी.




कांदा पिकावर पडणारे रोग त्यांची लक्षणे आणि त्यावरील औषधे.




करप्या रोग(ओला करप्या आणि साधा करप्या)

या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे पाच सुकून पिवळी पडल्यासारखे होते

औषधे- अमिस्टर, कॅब्रिओ टॉप लुना एक्सप्रेस,एम-45, २२० टीम साप


रोपास पिळ पडणे

हा देखील बुरशीजन्य रोग असून यामुळे कांद्याच्या रूपाला तीळ पडतो व रोपे पिळून खाली पडतात.

इन्फिन्टो,+याला जोडीदार म्हणून मार्शल हे कीटकनाशक घ्यावे.


थ्रिप्स आणि आळी

या रोगाने आळीही आतील तेलकट बाजू खाऊन कांद्याची पातिला उभ्या पद्धतीत वाळले सारखे डाग पडतात.

थ्रिप्समुळे पात सुकल्यासारखी होऊन त्यातला टवटवीतपणा कमी होतो.

कराटे हे औषध थ्रिप्ससाठी आणि याने जर आळी नाही मेली तर सेकंड स्टेज म्हणून आपण हे लियो, कोराजन, इमामेक्टीन अशी देखील औषधे वापरू शकता.


मर

हा बुरशीजन्य रोग असतो यामुळे रोपेंची मुळे कुजून रोपाची मर होते.

हे थांबवण्यासाठी आपणाला वरच्या टेबल मध्ये सांगितलेले एखादी बुरशीनाशक वापरून त्यासोबत बायोझाईम हे टॉनिक वापरावे.


🌿कांद्याला तुम्हाला अधून मधून जर एखादे टॉनिक मारायचे असेल तर आम्बिशन नावाचे एक टॉनिक भेटते हे कांद्यासाठी सर्वात बेस्ट टॉनिक म्हणून तुम्हाला वापरता येईल .🌿


कांदा लागवडीबद्दल ईतर माहिती.

लागवड आणि हंगाम .

साधारणतः कांद्याची लागवड खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात करता येते.


महाराष्ट्रात खरीप कांद्याच्या हंगामाची लागवड जून ते ऑक्टोबर या दरम्यान आणि रब्बी कांद्याची लागवड जानेवारी ते जून महिन्यापर्यंत करतात.

2. आंतरमशागत

कांदा पिकात अंतर्गत मशागत म्हणून आपणाला खुरपणी करावी लागते त्यामुळे संपूर्ण कांद्याने पर्यंत आपणाला दोन ते तीन वेळेस खुरपणी करावी लागते.

3.हवामान

कांदा हे पीक तसे पाहायला गेले तर हिवाळी पीक आहे पण त्याचे योग्य नियोजन करून आता कांदा हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते


थोडक्यात पाहायला गेले तर कांदा लागवडीपासून सुरुवातीचे एक दोन महिने हवामान थंड लागते आणि कांदा पोसायला ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळेस कांदा वाढीसाठी तापमानातली वाढ ही कांद्याच्या वाढीसाठी किंवा त्याच्या पोचण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.

4.कांदा पिकासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही जाती-

पावसाळी-पंचगंगा,एलोरा,नाशिक लाल,बलवंत-780,भिमा सुपर,फुले समर्थ,NDRF…….


उन्हाळी -भिमा शक्ति,फुरसूंगी,गावरान......