Namo Shetkari Sanman Nidhi yojna | "नमो शेतकरी महा -सन्मान निधी योजना" माहिती

 नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या मराठमोळ्या आणि आपल्या हक्काच्या मराठी स्टेशन वरती स्वागत. आपण नेहमी आपल्या स्टेशन वरती शेतकरी योजना,शासनाचे नवीन जी. आर नोकरी आणि बऱ्याच विषयी माहिती देत असतो आणि आपण दीलेली माहिती ही नेहमी आपण योग्य देण्याचा प्रयत्न करतो आपण तरीही आपणाला काही सुचवायचे असल्यास आपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत असेल. 

"नमो शेतकरी सन्मान निधी योजना"/nmo maha sanman nidhi yojna 

जस की आपणा सर्वांना माहिती आहे की,शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने pm kisan nidhi yojana चालू केली आहे आणि आता त्याचा ज जवळ 14 वा हप्ता अगदी काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होईल. आणि या  सरकारी योजने अंतर्गत वार्षिक दर 4 महिन्याला शेतकारींच्या खात्यामध्ये 2000 हजार रुपये जमा होतात. 

काय आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना ?

आता जसे पी. एम किसान योजने अंतर्गत जसे शेतकऱ्याला 6000 रुपये मिळतात तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत आता शेतकऱ्याला आणखी 6000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर दर वर्षी पीएम किसान योजना आणि (Nmo shetkari sanman nidhi yojna) चे सहा -सहा हजार असे मिळून शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. 

शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे ?

आता हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि या योजनेसाठी ते प्रत्येक शेतकरी पात्र आहेत जे पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत,आणि त्याच शेतकऱ्यांना या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेता येणार आहे.(Namo Shetkari Sanman Nidhi Yojna)
आता शासनाने या योजनेला मान्यता दिलेली असून आता लवकरच म्हणजे मे च्या शेवटच्या किंवा जून च्या पहिल्या थवा दुसऱ्या आठवड्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हप्ता मिळण्यासाठी या गोष्टी आहेत बंधनकारक-

👉आपल्या बँक खात्याला आपला मोबाइल नंबर लिंक आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. 
👉 हा निधी मिळवण्यासाठी त्याने आपली ई-केवायसी केलेली असावी.

 
👉1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच या योजनेत पात्र असेल. 
👉लाभार्थी ने त्याच्या मालमत्तेची माहीती देणे ही बंधन कारक असेल.