पी.एम. किसान ई-केवायसी | अशी करा ई केवायसी नाही तर मिळणार नाही हप्ता |

 नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या मराठी स्टेशन वरती स्वागत. आपण आपल्या वेबसाइट वरती कायम विविध योजना,बातम्या,नोकरी विषयी माहिती देत असतो आणि आपली दिलेली माहिती ही नेहमी आपण विश्वास पूर्ण आणि एकदम अचूक देण्याचा प्रयत्न करतो. तरी आपनास काही सुचवायचे असल्यास आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा आपल्या सुचनांचे नेहमी स्वागत असेल. 


काही वर्षांपूर्वी भारत सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ पीएम किसान सन्मान निधी योजना चालू केली होती आणि  सरकारने वेळो वेळी सूचना देऊन काही तांत्रिक बाबी शेतकऱ्यांसाठी पूर्तता करण्यास सांगितले यातीलच एक आहे की पीएम किसान सन्मान निधी ची E-KYC करणे. आता यात बऱ्याच शेतकऱ्यांनी आणखी सुद्धा E-KYC  केली नाही पण आता जर शेतकऱ्यांनी E KYC नाही केली तर लवकरच त्यांना मिळणारे 6000 रुपये बंद होणार आहेत. तेव्हा हा निधी मिळण्यासाथी PM KISAN E-KYC करणे गरजेचे आहे आणि आता आपण या लेखमध्ये हेच पाहणार आहीत की,आपण घरबसल्या E-KYCकरू शकतो. 

पीएम किसान योजनेची ए केवायसी कशी करायची?PM KISAN E-KYC

आता तुम्हाला घरी बसल्या PM KISAN E-KYC करता येणार आहे त्यासाठी आपणाला पुढील लिंक👉 https://pmkisan.gov.in/  वरती जायचे आहे आणि  येथे आल्यावर आपनाला खाली क्रॉल केले की तेथे शेतकरी कोर्नर म्हणून एक टेबल आहे. आणि त्यामध्ये E KYC म्हणून एक टेबल आहे तेथे क्लिक करायचे. नंतर तेथे खाली दिल्याप्रमाणे एक आणखी टेबल ओपन होईल. त्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकायचा. 
योग्य आधार क्रमांक टाकला की,आणखी एक टेबल ओपेन होईल ज्यात तुम्हाला  तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेला मोबईल क्रमांक टाकायचा आहे. मोबाइल नंबर टाकला की तुमच्या नोंदणी-कृत क्रमांक वरती एक OTP मिळेल. हा OTP तूम्ही टाकला की,तुमच्या मोबईल वरती आणखी एक OTP येईल तो तुम्ही तेथे टाकायचा आणि सबमिट बटन वरती क्लिक करायचे. आता सबमिट केले की तुम्हाला PM KISAN E-KYC पूर्ण असा संदेश येईल म्हणजेच तुमची ए केवायसी झाली असेल. लक्षात घ्या तुम्हाला जर घर बसल्या PM KISAN E-KYCकरायची असेल तर आपला मोबाइल क्रमांक हा आधार कार्ड ला लिंक असणे गरजेचे आहे. आपणाला दिलेली माहिती जर योग्य वाटली असेल तर आपल्या या वेबसाइट ला फॉलो नक्की करा. धन्यवाद.