"मागेल त्याला शेततळे"2023:योजना पुनः चालू आता लॉटरी पद्धत बंद

"मागेल त्याला शेततळे"योजना पुनः चालू 




 सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की ,नुकत्याच समोर आलेल्या माहिती नुसार माननीय कृषि मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी घोषणा केली आहे की आता मागेल त्याला शेततळे मिळणार. महाराष्ट्र शासनाने 2016 साली ही योजना चालू केली होती. तत्कालीन मा. जी.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुष्काळी भगत दौरा करताना पावसात पडलेलेला खंड आणि पाण्याची टंचाई आणि पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य केली होती

या योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे देण्यासाठी शासनाने हिवाळी अधिवेशनात नागपूर अधिवेशनात मागेल त्याला शेततळे ही योजना ची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत 1,11,111 शेततळे शासनाने देण्याचे मान्य केले. या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ सुद्धा घेतला परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. पावसाळ्याच्या खंडित वेळेत अनेक शेतकाऱ्यांनी आपल्या शेततळ्याचा वापर करून अधिक समृद्धी साधली. परिणामी याचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. 

पण पाठीमागच्या वर्षापासून या योजनेला स्थगिती देण्यात आली आणि शेतकऱ्यांना शेतातले मिळविण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागायला लागली,आणि सर्वाना शेततळे मिळणार की नाही याची शस्वती कमी झाली परिणामी अनेक शेतकऱ्यांना याचा तोटा सहन करावा लागला आणि त्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले. 

आता नुकतेच मंत्रिमंडळ खात्याची वाटप झाली आणि यात माननीय कृषि-मंत्री धनंजय मुंडे साहेब  यांच्याकडे महाराष्ट्र राज्याची कृषिमंत्री म्हणून जबाबदारी आली आणि त्यांनी लागलीच सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना पुनः चालू करत आता पूर्वी सारखे मागेल त्याला शेततळे मिळणार असून आता जुनी लॉटरी पद्धत बंद होऊन आता प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो असे माननीय मंत्री मुंडे साहेब यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे हुई नक्कीच सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.