ऑनलाइन पॅन कार्ड-कसे काढायचे | ONLINE PAN CARD

नमस्कार मराठी वाचकहो आपल्या सर्वाचे आपल्या मराठी स्टेशन वरती स्वागत. आपण आपल्या साईट वरती नेहमी सर्वांच्या हिताची आणि त्यांना अगदी समजेल अशी माहीती देत असतो त्यामुळे आपण कायम आपल्या म्हणजे मराठी स्टेशन या साईट ला भेट देत चला म्हणजे आपणाला योग्य ती माहीती आणि सोपी माहीती जी सर्वांच्या हिताची आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील,धन्यवाद.

पॅन कार्ड:

    तर आज आपण पॅन कार्ड आपण घरच्या घरी कसे काढायचे ते पाहू त्यामुळे आपला हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.पॅन कार्ड हे आजच्या रोजच्या जीवन-शैलीतील लागणारे खूप महत्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. पॅन कार्ड हे भारतीय आयकर अधिनियम,1961 च्या नियमंतर्गत दिल जाणारा एक कायमस्वरूपी आणि इंग्रजी मुळाक्षरे आणि अंक यांची एक मिसळ स्वरूपाचा आणि 10 अंकी असणारा एक परमनंट नंबर आहे. हा क्रमांक आयकर विभागामार्फत देण्यात येतो.

पॅनकार्ड चे फायदे आणि उपयोग :

  • पॅन कार्ड हे जास्त करून आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे किंवा बहुड ते जास्त करून आर्थिक व्यवहार करताना वापरत आणले जाते. 
  • जर आपल्याला कोणत्याही बँकेतून मग ती बँक सरकारी,सहकारी,किंवा कोणतीही असो जर आपणाला 50000 किंवा त्यापेक्षा जास्त अधिक रक्कम एकच दिवशी भरना करायची असेल तर आपणाला पॅन कार्ड बँकेला दाखवणे बंधनकारक आहे जर आपण आपले पॅन कार्ड बँकेला लिंक केले असेल तर काही गरज नाही,म्हणून तर आता बऱ्याच बॅंक आपल्या खात्याला पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक करत आहेत. त्यामागे सुद्धा चांगला हेतु आहे की आयकर भरण्यापासून लोक टाळा-टाळ करतात. ते होऊ नाही म्हणून त्यांच्या खात्यावर पॅन कार्ड द्वारे व्यवहार करून आयकर भरण्यास त्यांना भाग पाडले जाते. 
  • जर आपणला कोणत्याही बँकेत सावधी ठेव किंवा टाइम डिपॉजिट करायचे असेल तर आपणाला पॅन कार्ड असणे खूप गरजेचे आहे. 
  • थोडक्यात काय तर,जास्त रकमेचा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर आपल्या जवळ पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.

पॅन कार्ड  कागदपत्रे 

  • पॅन कार्ड काढताना आपनाला खालील कागदपत्रे लागतात.-
  • पासपोर्ट साईज 2 फोटो. 
  • आधार कार्ड. 
  • मोबाइल क्रमांक.
  • आपल्या आधार ला मोबाइल क्रमांक लिंक असेल तर खूपच फायद्याचे ठरते. 

पॅन कार्ड कसे काढायचे 

  •  आता आपण पॅन कार्ड फिजिकल पॅन आणि ई- पॅन. 
  • फिजिकल पॅन हे ते पॅन असते जे आपण ऑनलाइन केल्यानंतर 10 ते 15 दिवसात आपल्या दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने येते.
  • आणि ई-पॅन असे पॅन कार्ड असते जे आपण मोबाइल किंवा लॅपटॉप ने ऑनलाइन पद्धतीने घरी बसल्या काढू शकतो पण ते पत्त्यावर न येता आपण त्याची पीडीएफ डाउनलोड करून काढून घ्यायची असते. 
  • फीजिकल पॅन आणि ई-पॅन यांना सारखाच दर्ज असतो. 
  • आपण याला पाहिज तर स्मार्ट कार्ड सारखे किंवा फिजिकल पॅन सारखे देखील छापून घेऊ शकतो. 

ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढायचे?

  • आपणाला जर ई-पॅन पाहिजे असेल तर आपला मोबाइल क्रमांक हा आधार कार्ड ल लिंक असणे आणि तो मोबाइल क्रमांक आपल्या जवळ असणे बंधनकारक आहे तरच आपण इन्स्टंट ई-पॅन काढू शकतो. 
  • आता आपण ऑनलाइन पॅन कार्ड कअसे काढायचे ते पाहू. सर्वप्रथम आपणाला अधिकृत म्हणजे www.incometax.gov.in या लिंक ल भेट द्या. 
  • तिथे गेले की तुमच्यासमोर एक क्विक लिंक म्हणून एक टेबल येईल त्यात तुम्ही Instant E-Pan म्हणून एक ऑप्शन येईल तेथे क्लिक करा आणि आता एक नवीन पेज ओपेन होतील आता त्यात तुम्हाला तेथे 2 टेबल दिसतील-1-Get a E-Pan आणि 2-check status &Download pan आहे त्यात तुम्हाला Get a E-Pan व क्लिक करायचे आणि नव्याने ओपन झालेल्या लिंक ला लिंक ला आपला बारा अंकी आधार कार्ड क्रमांक टाकायचा. 
  • आधार क्रमांक टाकला की त्यात खाली एक छोटासा बॉक्स आहे त्याला टच केले की countinue बटन वर क्लिक करायचे. 
  • आता तुम्ही आणखी एक नवीन टॅब मध्ये जाल आणि तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील माहितीप्रमाणे सर्व फोटो आणि ईतर माहिती दिसेल. आता आपण तेथे खाली जाऊन क्लिक केले की खाली स्क्रोल केले की तुम्हाला आणखी एक लहान चौकट दिसले त्यात तुम्हाला क्लिक करून generate aadhar otp वर क्लिक करायचे आणि आता तुमच्या आधार क्रमांक वर लिंक असलेल्या मोबाइल वरती otp येईल तो तिथे टाकायचा. 
  • आता आपण आणखी एक नवीन टॅब मध्ये जल जेथे तुम्हाला तुमच्या आधारवरचा तुमचा फोटो आणि बाकी डीटेल दिसतील आता त्याला आपण तसेच खाली येवून confermation केले की आपले तुमच्या सर्व डीटेल पूर्ण होऊन तुमचे पॅन कार्ड काढण्याची प्रोसेस झाली. 
  • आता आपण पॅन कार्ड काढण्यासाठी 48 तास वाट पहावी शक्यतो आपणाला 2 ते 3 तासातच मिळून जाते पण तो एक ऑफिसीयल टाइम आहे. 
  • आता आपणला आपले पॅन कार्ड आले आहे की नाही हे पाहण्यासाठी डबल त्या अधिकृत म्हणजे www.incometax.gov.in या साईट वर जायचे आणि तेथे Instant E-Pan वर क्लिक केले की नवीन टॅब मध्ये पहिल्या प्रमाणे 2 टेबल दिसतील त्यातील check status &Download pan  ल क्लिक करायचे आता आपण आणखी एक नवीन टॅब मध्ये जाल आणि तेथे तुम्ही आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा. 
  • तो टाकला की,तुमच्या आधार कार्ड क्रमांक वरती आणखी एक otp येईल तो टाकायचा म्हणजे आपली pdf फाइल डाउनलोड होईल. 
  • ती झाली की ती ओपेन करताना तुम्हाला एक पासवर्ड मागेल हा पासवर्ड टाकताना तुम्ही तुमची आधार कार्ड क्रमांक वरची जी तुमची जन्म तारीख आहे ती तिथे टाकायची. 
  • फक्त टाकताना तुमची जन्म तरीक जर समजा 01/01/1950 अशी असेल तर ती तशी न टाकता 01011950 अशी टाकायची म्हणजे आली फाईल ओपेन होईल आता आपण याची प्रिंट कडून घ्या आता हेच आपले आधार कार्ड असेल. 
  • जर समजा तुम्हाला check status &Download pan येथे जाऊन आधार otp नाही आला तर समजायचे की आणखी आपले पॅन कार्ड आणखी प्रोसेसिंग लाच  आहे त्यामुळे आपण थोडी वाट पहावी आणि मग पुनः चेक करून पॅन कार्ड काढून घ्यावे. 
  • अशा रीतीने आपण घर बसल्या आपले पॅन कार्ड काढू शकता. 
CONCLUSION
1-घरी बसून पॅन कार्ड कसे काढायचे ?
    होय ,आपणाला घरी बसून पॅन कार्ड काढता येते फक्त आपल्या आधार क्रमांक ला मोबाइल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे . आणि बाकी सर्व प्रोसेस आपण लेखात दिली आहे.
 
2-पॅन कार्ड म्हणजे काय?
    पॅन कार्ड हा आयकर विभागाकडून दिला जाणारा एक परमनंट नंबर आहे जो आर्थिक व्यवहार करताना कमी येतो,pan card full form-Permanent Account Number असा आहे.

3-पॅन कार्ड कधी पासून अमलात आणले?
    हे भारत शासनाने 1972 पासून भारतीय आयकर अधिनियम,1961 अंतर्गत अंमलात आणले गेले आहे.
तर आपणाला दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि ही माहिती अधिक अधिक लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.