आयुष्यमान हेल्थ कार्ड | Aayushman health card

महाराष्ट्र सरकार नेहमी आपल्या जनतेसाठी आणि त्यांच्या सोयीसाठी विविध योजना आणि ईतर बाबी घेवून येत असते त्यात अशा योजना असतात ज्या खास गरीब जनता आणि गरजू लोकांसाठी असतात. मग त्या योजना शेती किंवा आरोग्य,महिला सबलिकरण विद्यार्थी आणि इतर बाबीविषयी असुदयात त्यातच आणखी एक योजनेने भर घातली आहे ती म्हणजे आयुष्यमान भारत योजना तर आपण या लेखामध्ये या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे आपला हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि आपण देखील या योजनेचा नक्की फायदा घ्या. 

आयुष्यमान भारत योजना ची माहीती-

ही योजना ही अश्या लोकांसाठी म्हणजे जे गरीब आणि गरजुवंत आहेत ज्यांची आरोग्य सुविधा घेण्याची ऐपत नाही आणि पैसा नसल्या कारणांनी ती त्यांना महागडे दवाखाणे परवडत नाहीत. त्यामुळे भारत सरकारने ही योजना चालू केली आहे ही अशी योजना आहे ज्यामध्ये गरीब आणि गरजू लोक अगदी मोफत आपला इलाज करून आपल्या रोगावर मात करू शकतात. 
या योजनेमधून प्रत्येक लाभार्थ्याला एक हेल्थ कार्ड दिले जाते त्याचे नाव म्हणजे आयुषमान हेल्थ कार्ड आपण या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी हे कार्ड आपल्या जवळ असणे आवश्यक आहे. या कार्ड धारकास सुमारे 1300 रोगांवर  मोफत इलाज दिला जातो. या योजनेतून कार्ड धारकास 500000 रुपयांचे वार्षिक कवर सुद्धा मिळते जमधून ती कार्ड धारक व्यक्ति हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होण्याच्या 3 दिवस अगोदर आणि डिस्चार्ज नंतर 15 दिवस पर्यंत येणारा सर्व खर्च या योजनेमार्फत करता येतो. फक्त यासाथी त्या व्यक्ति जवळ आयुष्मान हेल्थ कार्ड असणे गरजेचे आहे. 
हे देखील वाचा 👉 कुसुम सोलार पंप योजना

आयुष्यमान हेल्थ कार्ड काढण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतात?

  1. आधारकार्ड. 
  2. शिधापत्रिका. 
  3. आधार कार्ड ला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक.
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो. 

कार्ड काढण्यासाठी पात्रता-

  1. भारताचा नागरिक असणे गरजेचे. 
  2. पिवळे रेशन कार्ड असणे आवश्यक. 
  3. अर्जदार नाव जनगणणे मध्ये असणे गरजेचे. 
  4. घरातील कोणत्याच व्यक्तीच्या नावी पक्के घर नसावे. 
  5. आरोग्य यादीत नाव असावे.

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड काढण्याचे फायदे-

  1. सरकारी लिस्ट मध्ये असलेल्या दवाखान्यात कार्ड धारक व्यक्ति 5 लाख पर्यंत कॅश लेस व्यवहार करू शकतो. 
  2. कोविड पेशंट देखिल या योजनेचा फायदा घेवू शकतात. 
  3. कार्ड धारकांना 5 लाख पर्यंत कॅश लेस मोफत उपचार घेता येतात. 
  4. कार्ड धारक या योजनेचा लाभ देशातील कोणत्याही खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये घेवू शकतात. 
  5. या योजनेअंतर्गत 1 हजार 300 पेक्षा जास्त आजारवर उपचार केले जातात. जसे की ,कॅन्सर,ह्रदयरोग. मधुमेह,किडनी इत्यादी. 
तर आपण देखील या योजनेचा फायदा घेऊन मोफत उपचार घेऊ शकता त्यामुळे या साठी आयुष्यमान हेल्थ कार्ड काढणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण या माहिती आधारे कार्ड काढू शकता धन्यवाद.