Seema Haider: सीमा हैदर आता दिसणार Bollywood मध्ये ?



पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून पाकिस्तान आणि  भारत यांच्या सोशल मिडिया च्या बातम्या ना उधाण आले आहे त्याचे खास कारण ठरले आहे ते म्हणजे सीमा आणि अंजु . सीमा ही सचिन साठी पाकिस्तान सोडून भारतात आली आली आणि अंजु ही भारत सोडून पाकिस्तान मध्ये गेली आता सगळीकडे फक्त आणि फक्त यांच्या च चर्चा चालू आहेत. 

एकीकडे अंजु ही भारत सोडून पाकिस्तान मध्ये आपल्या प्रेमी साठी त्याला भेटायला गेली आणि आता ती तिकडेच राहून आपले जीवन व्यथित करणार आहे,आणि विशेष म्हणजे या दोन्ही प्रेमकथा या ऑनलाइन गेमिंग मधून झाल्या आहेत. एरवी भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांना आपले कट्टर विरोधक मानले जातात पण या दोन जोडी म्हणजे सीमा आणि अंजु याला मात्र अपवाद ठरवताना दिसतात,एकीकडे सीमा भारतात आली आणि अनेक प्रश्नांना उधाण आले आहे की ती कुठल्या संघटनेशी संबंधित आहे की काय? ती भारतात कोणत्या वेगळ्याच उद्देशाने आली की काय?अनेक प्रश्न ज्यांची पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून A.T.S.  चौकशी देखील करत आहे. 

पाकिस्तान मध्ये अंजु गेली आणि तिच्यावर अनेक भेटवस्तू आणि अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा वर्षाव झाला. आणि सीमा भारतात आली तेव्हा तिच्या अनेक संभ्रमात टाकणाऱ्या उत्तरमुळे ती आणखीच या वेढ्यात गुंतत गेली,पण आता याला अपवाद म्हणून भारत देखील सीमा हिला चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर मिळाली आहे. मेरठ येथील चित्रपट निर्माता अमित जानी यांनी तिला आपल्या नुकत्याच सुरू केलेल्या "जानी फायरफॉक्स "मध्ये  अभिनयाची संधि दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून चालनाऱ्या चौकश्या आणि मीडिया च्या त्रासामुळे सचिन आणि सीमा यांना खायचे वांदे झाले आहेत. सुरुवातीला मी सचिन आणि सीमा यांच्याशी मी संबंधित नव्हतो पण त्यांच्या वर आलेल्या या परिस्थितीमुळे मी मदत करण्यासाठी पुढे आलो आहे,असे अमित यांचे म्हणने आहे सोबतच अमित यांनी आपल्या प्रोडक्शन हाऊस मध्ये सचिनला काम करण्याची संधि दिली आहे आणि सोबतच तुला लाखोचे मानधन देऊ असे आश्वासन दिले आहे.आता सर्व भारतीयांचे याकडे लक्ष वेधले आहे की,सीमा खर्च अमित यांच्या चित्रपट मध्ये काम करते की काय ?