Talathi syllabus marathi: तलाठी अभ्यासक्रम मराठी

 

 नमस्कार,पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून आपण सर्व जन प्रतीक्षेत असलेल्या तलाठी भरतीच्या जाहिरत आता आली आहे. आणि आता बरेच जण या संभ्रमात आहेत की याची परीक्षा कशी होईल,किती मार्कची असेल कोणते विषय असतील आणि ते किती मार्कचे असतील. असे बरेच प्रश्न आज अनेक विद्यार्थी मनात घेऊन आहेत. आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे याचा सिल्याबस काय आहे हे अनेक जन विद्यार्थी मनात घेऊन आहेत आणि याच प्रश्नाच उत्तर आपण या लेखात घेऊन आलो आहोत. त्यामुळे हा लेख विचारपूर्वक आणि ध्यान देऊन वाचा आणि हा सिल्याबस एक कागदावर लिहून काढा आणि या प्रमाणे अभ्यास करा आपणाला या लेखाने नक्कीच यश मिळण्यास मदत होईल. 

आपण या लेखात अभ्यासक्रम सोबत कोण कोणती पुस्तके वाचायला हवीत याची ही माहीती देणार आहोत आणि या सोबतच ही पुस्तके ऑनलाइन खरेदी करण्यासाठी लिंक देत आहोत त्यामुळे ही ऑनलाइन पुस्तके आपण खरेदी करून अभ्यासाला लवकर सुरू करा,

जर तुम्हाला आपल्या टेलेग्राम चॅनेल ला जॉइन होयचे असेल तर मी येथे लिंक देत आहे. आपल्या लिंक ला जॉइन व्हा कारण आपण या वरती तलाठी भरती होईपर्यंत रोज प्रश्न मंजूषा घणार आहोत आणि लगेच त्याचे संध्याकाळी ऑनलाइन विडियो वरुण माहीती देणार आहोत यामुले नक्कीच आपल्याला परीक्षेत यशाच्या जवळ जाण्यास मदत होईल.चला तर आपण आता तलाठी भरती चा अभ्यासक्रम सविस्तरपणे पाहू. 

तलाठी भरती अभ्यासक्रम मराठी |TALATHI BHARTI SYLLABUS MARATHI  2023 

   तलाठी भरती ही 200 मार्कची असते आणि या परीक्षेत 100 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न हा  गुणाचा असतो आणि यासाठी निगेटिव मार्किंग नाही म्हणजे काय तर? MPSC EXAM मध्ये जर तुमचा मार्किंग केलेला चार प्रश्न चुकले तर तुमच्या बरोबर असलेल्या मार्क मधून एक मार्क वजा केला जातो याला निगेटीव मार्किंग म्हणतात आणि तलाठी भरतीला आता पर्यंत ही पद्धत लागू नसल्याने काही वेळा आपण दिलेल्या उत्तराची आपल्याला शस्वती नसली आणि आपण तो सोडवला आणि योगा-योगाने जर तो बरोबर आला तर आपल्याला 1 मार्क मिळून जातो त्यामुळे आपण सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. 
👉 मराठी-25,इंग्लिश-25,गणित-25,आणि सामान्यज्ञान-25 असे मिळून 100 प्रश्न असतात आणि यांना प्रत्येकी 2 गुण असतात. म्हणजे हा पेपर 200 गुणांचा होतो.
आता या 4 घटकांमध्ये कोण-कोणत्या टॉपिक वरती प्रश्न येतात ते आपण खाली पाहू.

 👉मराठी 
मराठी विषय हा 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा म्हणजे 50 गुणांचा राहतो. त्याचे सबटॉपिक खालील प्रमाणे
  •  शब्दांच्या जाती 
  • नाम,सर्वनाम,क्रियापद, विशेषण,क्रिया-विशेषण ई.. 
  • संधि आणि संधि चे प्रकार 
  • विभक्ती 
  • समानार्थी शब्द 
  • विरुद्धार्थी शब्द 
  • समास 
  • म्हणी 
  • समूह शब्द 
  •  प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक 
  • शब्दसंग्रह 
  • वाक्यप्रकार चे अर्थ आणि उपयोग 
  • रस 
  • लिंग ओळख 
  • मराठी व्याकरण 
  • शब्द सिद्धी आणि ईतर बाबी.. 

बहुतेक वेळ तलाठी भरती चा अभ्यास करताना आपण नेहमी या विषयाकडे दुर्लक्ष करतो परिणामी आपणाला हवा तो रिजल्ट मिळत नाही आणि आपल्या हातामधून एक चांगली संधि निघून जाते. आता तस पाहायला गेल तर मराठी हा विषय इतका सोपा पण नाही आणि इतका अवघड पण नाही जर आपण या विषयाचा नियमितपणे अभ्यास केला तर आपणाला यात पैकीच्या पैकी देखील मार्क मिळवता येतात,तर काही विद्यार्थी यात पैकीच्या पैकी गुण घेतात देखील.

आता मार्केट मध्ये बरीच अशी पुस्तके आहेत ज्याने विद्यार्थी गोंधळून जातात पण मराठी व्याकरण साठी सर्वात उत्तमं पुस्तक म्हटल तर फक्त दोनच पुस्तकांची नावे आवर्जून घ्यावी वाटतात ती म्हणजे एक तर बाळसाहेब शिंदे सरांच पुस्तक आणि मो. रा. वाळंबे सरांच पुस्तक. आता यातही जर बेस्ट म्हणून विचार करायचं झाला तर सरळ सेवा भरती साठी बाळसाहेब शिंदे सरांच पुस्तक पुरेस होत पण तुम्ही जर सरळ सेवा सोबतच वर्ग आणि वर्ग 2 च्या पदासाठी तयारी करत असाल तर मो. रा. वाळंबे सरांच पुस्तक वन ऑफ द बेस्ट ठरत त्यात तीळमात्र शंका नाही. पण आपण आता फक्त तलाठी भरती च बोलतोय त्यामूळे बाळसाहेब शिंदे सरांच पुस्तक पुरेस होत. 

👉ENGLISH 
  • PART OF SPPECH 
  • SYNOMS AND ANTONYMS
  • IDIOMS AND PHRASES
  • QUESTION TAG
  • WH QUESTIONS 
  • PUNCTUATION
  • TENSES
  • VOICE
  • VOCABULARY
  • ARTICLE 
  • NARRATIONS 
  • FILL IN THE BLANKS IN SENTENSE etc ....
सरळ सेवा भरतीची तयारी करणाऱ्या मुलांमध्ये सर्वात जास्त भीती या विषयाची असते कारण त्यांना इंग्लिश हा विषय खूप अवघड वाटतो पण तुम्हाला सर्वांना आवरुजन सांगावंस वाटत मित्रहो हा विषय मराठी विषया पेक्षा सोपा विषय आहे फक्त आपण आपल्या मनातील नुनगंड बाजूला काढावा आणि रोज न चुकता जर याचा आपण नीट 2 ते 3 महीने अभ्यास केला तर आपणाला नक्कीच यात भरपूर मार्क मिळतात. आता फक्त तलाठी भरतीच्या पर्यंत बोल तर आपणाला बाळा साहेब शिंदे सरांच पुस्तक खूप योग्य आहे.

👉बुद्धिमापण आणि अंकगणित
  •  आपणाला हा मात्र असा विषय आहे की,ज्यात आपण खात्रीने अगदी पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो फक्त या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा एकच साधा मंत्र आहे तो म्हणजे सराव!सराव!आणि फक्त सराव.
  • अंकगणित 
  • बेरीज 
  • वजाबाकी 
  • गुणाकार 
  • भागाकार 
  • लसावी आणि मसावी 
  • पूर्णांक आणि अपूर्णांक 
  • चलन 
  • काळ,काम,वेग या संबंधी गणिते 
  • दिनदर्शिका 
  • घडयाळ 
  • मापणे 
  • सरासरी 
  • नफा तोटा 
  • चक्रवाढ व्याज  
बुद्धिमापण 
  • अंकमालिका
  • अक्षरमालिका 
  • वेण आकृत्या आणि बाकी आकृतींवरील प्रश्न 
  • अक्षर आणि अक्षर मालिका आणि त्यावरील प्रश्न 
  • समसंबंध 
  • वाक्य निष्कर्ष 
  • अंकामधील समसंबंध आणि ईतर.. 
अंकगणीत आणि बुद्धी-मापण विषयासाठी अनेक पुस्तके बाजारात उपलढ आहेत पण अभ्यासाच्या दृष्टीन तुम्हाला काही पुस्तके येथे देण्यात आली आहेत. 
👉अंकगणित साठी 2 पुस्तके कोणतेही एक घ्या-1)पंढरीनाथ राने सरांच पुस्तक 2)फास्ट-ट्रॅक
👉 बुद्धीमापण साठी सर्वात मस्त पुस्तक आहे ते म्हणजे अनिल अंकलगी यांच पुस्तक. 

सामान्य-ज्ञान  
  • तस पाहता सामान्य ज्ञान हा खूप विस्तृत विषय आहे याचा अभ्यास खूप अवाढव्य आहे पण आपणाला रोजच्या वाचनाणे या देखील विषयात चांगले गुण मिळवू शकतो. 
  • भूगोल-
  • इतिहास 
  • विज्ञान 
  • चालू घडामोडी 
  • नागरीकशास्त्र /राज्यशास्त्र 
  • माहिती अधिकार अधिनियम 2005 
  • माहिती आणि तंत्रज्ञान(या टॉपिक वर संगणकवरील प्रश्न विचारले जातात.)   
       सामान्य ज्ञान चा अभ्यास करताना आपणाला खूप जास्त अभ्यास करावा लागतो त्यासाठी आपणाला 5 ते 10 वी पर्यंत इतिहास,भूगोल ,विज्ञान ची पाठ्यपुस्तके वाचावी लागतात. जर आपणाला हा खूप जास्त मोठा वाटत असेल तर समाधान निमसारकर सरांच पाठ्यपुस्तकावर आधारित स्टेट बोर्ड अंतिम सत्य हे पुसटक भेटत ते तुम्ही खरेदी करू शकता. आणि तुम्हाला उजळणी साठी एखाद पुस्तक हव म्हणून आपण तात्यांचा ठोकळा किंवा त्यापेक्षाही सुटसुटीत आणि परिपूर्ण माहिती असलेले प्रकाश गायकवाड सरांच फौजदार यशोमार्ग नावाचा एक ठोकला भेटतो तो वापरू शकता. आणि चालू घडामोडी साठी तुम्ही कुठलही एखाद चांगल पुस्तक वापरा जसे की,-अभिनव प्रकाशन,देवा जाधवर सरांच पुस्तक ,किंवा पृथ्वी परिक्रमा,आणि सिम्प्लिफाईड चे यातले कुठलेही एक वापरा आणि आपणला माहिती अधिकार अधिनियम 2005 ची माहिती ऑनलाइन तर मिळेलच आणि पुस्तक हवे असेल तर यशोदा प्रकाशनच च पुस्तक वन ऑफ द बेस्ट राहील.आणि माहिती आणि तंत्रज्ञान साठी आपण पाठीमागच्या प्रश्न-पत्रिका वाचा कारण बऱ्याचदा हेच प्रश्न रिपीट होतात.


Q&A ZONE :
Q-    महाराष्ट्र तलाठी भरतीचा कट ऑफ कीती लागतो?
ANS-तस पाहता प्रत्येक वेळी कट ऑफ हा वेगळा वेगळा लागतो आणि 2019 च्या कट ऑफ चा विचार करता आपण अंदाज लावू . 
  1. खुला - 172-180 
  2. OBC- 170-176 
  3. EWS-168-176 
  4. अनू.जाती-160-168 
  5. एस.टी -150-162 
  6. व्ही. जे -160-168 
  7. एन.टी -160-168
Q-तलाठी भरती देण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?
  • ANS-
  • खुला -18 ते 38 वर्ष 
  • खेळाडू-18 ते 43 वर्ष 
  • माजी सैनिक-18 ते 45 वर्ष 
  • मागासवर्गीय -18 ते 43 वर्ष 
  • अपंग,भूकंपग्रस्त,आणि प्रकल्पग्रस्त-18 ते 45 वर्ष.